Saturday, September 20, 2008

शिवाजी राजांचे गुरू कोण?

शिवाजी राजांचे गुरू त्यांचे आई-वडिल आणि त्याहीपेक्षा अधिक तत्कालीन राजकारण असावे असे वाटते. तरी खाली काही प्रश्न आहेत -
प्रश्न उपस्थित करणे हा एक लोकप्रियता (तिहि फाजिल) मिळविण्याचा राजमान्य राजरस्ता झाला आहे. ह्या अश्या पोरकट व्यापामधे मि पडणार नव्हतो पण जबाबदारि म्हणुन् घेतलि सबब हा उत्तरान्चा सन्च. खरे तर या सर्व प्रश्नान्चि उत्तरे कानाखालि ओढणे एक हाच आहे.
इतिहास हा कधि हि तटस्थ व्रुत्ति ने लिहिला जातो.
इति + ह + आस = इतिहास
जो जसा घडला तसा लिहिला जातो.
यात जर - तर ला थारा नसतो. जे घडले तसेच्या तसे लिहिले जाते.

१. पुणे-जुन्नर भागातील शहाजी राजांची जहागिर अदिलशाही आणि मोघलांनी बेचिराख करून टाकली होती. त्या भागातच जिजाबाईंना पाठवण्यात शहाजीराजांचे कोणते राजकारण असावे?
आजकाल जशि नोकरि केलि जाते तशि नोकरि शहाजि राजे यान्चे काळात केलि जात नव्हति. मुघलान्कडे तर सैनिकाना पगारच दिला जात नव्हता तर लुटिचा हिस्सा मिळत होता. रोख पगारि सैनिक हि प्रथा मुळात शिवाजि राजानी सुरु केलि. त्यामुळे शिवाजि महाराज व जिजाबाइ येथे राहुन आपलि जहागिर व शेतिभाति साम्भाळतिल यात शुद्ध हेतु हाच असावा.कारण जरि जहागिर नसलि तरि शेति भाति तरि करणे गरजेचे होतेच. त्याच बरोबर् इतर् मराठि जनता हि शेति करुन निटनेटके राह्तिल.


२. जिजाबाईंशी जाधव घराण्यामुळे त्यांचे विशेष सख्य नव्हते म्हणावे की जिजाबाईंचा मुत्सद्दीपणा पाहून त्या आणि लहान राजे लांब राहून आपले स्वप्न पुढे चालवू शकतील असा त्यांना विश्वास होता हे कळत नाही. जिजाबाई पुण्यात स्थायिक होत असता त्यांच्यासह हुशार सल्लागार आणि अमात्य देण्यात शहाजी राजांचे डावपेच होते काय?


याला काहि अर्थ नाहि. आपल्या मुला बायको सोबत हुशार अमात्य देणे हे गरजेचे का नाहि वाटणार? राज्य कारभार चालविणे हे एक टिमवर्क असते. जरि जिजाबाई मुत्सद्दि असल्या तरि एकट्याचिच जबाबदारि वर सोडणे त्याना बरोबर् वाटले नसेल्.

३. तरूण वयात दहा-पंधरा मावळ्यांच्या साथीने राज्य उभारण्याचे स्वप्न पहाणे शक्य असले तरी साकारणे कठिण होते. शहाजीराजांचा याला अव्यक्त पाठिंबा होता काय?
अर्थातच का नव्हता. वेळो - वेळि तो प्रत्यक्ष दिसुनहि आला होता.

४. रामदास स्वामी आणि तुकाराम हे राजांना खचितच गुरूस्थानी असावेत परंतु राजकारणात किंवा राजांना घडवण्यात यांचा सहभाग किती?

हे दोघेहि सन्त म्हणुन अर्थातच मोठे आहेतच् पण रामदास स्वामिन्चे महत्व आणि सहभाग आहेच आणि तो श्लोकबद्ध हे झाला आहे. उदा. विजापुरहुन सरदार निघाला आहे अशि रचना करुन् एक सन्देश अफझलखानाच्या वेळि पाठविला होता.