प्रेषक स्वामीयोगेश (शुक्र., ०३/१०/२००८ - १५:५१)
खरे खोटे काय ते ठरविणे हे ह्या चर्चेचे उद्देश्य नाहि. भारतिय घटने द्वारे प्रदत्त एका मुलभुत अधिकारान्बद्दल चर्चा मी येथे आमंत्रीत करीत आहे.
जसे भाषण, संचार इ. स्वातंत्र्य आहे तसेच स्थावर व जंगम संपत्ती संपादनाच मुलभुत हक्क सुरुवातिला होता.
पण सर्व प्रथम पंतप्रधान ज.ला. नेहरू याना समाजवादाची दारुची नशा अशी चढली होती के त्यानी हा अधिकार घटने दुरुस्ती द्वारे काढुन घेतला.
आज कश्मिर राज्याला असलेल्या विशिष्ट परिस्थिती मुळे आपण तेथे स्थावर व जंगम संपत्ती विकत घेउ शकत नाहि. पण इतरत्र घेउ शकतो.
पाकिस्तान, बांगलादेश मध्ये तर शत्रू संपत्ती कायदा आहे ज्यात निर्वासित झालेल्या हिंदुची संपत्ती स्थानीक नागरिक राजरोस पणे घेउ शकतात त्याची खरेदी विक्री हि करू शकतात. आज बहुराष्ट्रिय बैंकाना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे तर मग आमचे हात का बांधून ठेवले आहेत?
माझे तुम्हा सर्व सुविद्य मंडळिना विनम्र निवेदन आहे कि आपण या मुलभुत अधिकाराची पुनः आवश्यकता आहे कि नाही.