Tuesday, August 12, 2008

लॉबी फी

लॉबी फी तसेच लॉबी तंत्र म्हणजे लोकशाही तंत्र. वर्तमान पत्रामध्ये लेख छापून आणणे त्या त्या विशया तील तज्ञ मंडळींचे मत मतांतरे सर्व माध्यमात परत परत broadcast करणे याला अमेरिकन लोकशाही तंत्र म्हणतात. एनरोन वीज प्रकल्प येणार होता तेव्हा जरा आठवून तरी बघा. किती तरी लेख ई. छापून येत होते.

पण आपण मराठी मंडळी यात फारच मागास आहोत, त्यामुळेच तर ही दैन्यावस्था आहे.

घोडेबाजारातील सत्य

गेल्या आठवड्यात खासदारांच्या घोडेबाजाराचे सत्य उघडे पडले. खरोखरच अश्या प्रकारची देवाण घेवाण होतच असते पण ते सत्य चव्हाट्यावर आले. अमेरिकेत सुद्धा अश्या प्रकारची देवाण घेवाण होतच असते. पण तो पैसा त्या खासदाराच्या मतदारसंघात जन विकास कार्यान्मध्ये खर्च केला जातो. त्याल लौबी फी असे म्हणतात.

माझा मते भारतात ही अशीच लौबी फी सुरू करावी की ज्या योगे अश्या रकमेची देवाण जऱी झाली तरी त्याचा विनियोग जन सामान्यान्साठी होउ शकेल.

Wednesday, July 30, 2008