Wednesday, November 12, 2008

गेली ५० वर्षे मूंबई एक बाजारपेठ: नवीन पैलू


५० वर्षे मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
ईंग्रजानी मुंबईला प्रकाशझोतात आणि राजकिय वर्तुळात महत्त्वपुर्ण स्थान मिळवून दिले.
पुढे कालंतराने मुंबईने आपला विकास असंख्य उद्योगाद्वारे करून घेतला. पण यातिल एक महत्वपुर्ण मेख आपण समजुनच घेत नाही ति अशी किः

१) भारतात कुठलेही उत्पादन हे मुंबई मध्येच सर्वप्रथम बाजारात आणले जाते.
२) मुंबई चि भोळी जनताच आधी त्यची बकरा बनते. त्यानंतरच ते इतरत्र दुसर्या शहरान्मध्ये विक्रिसाठी उपलब्ध केले जाते. ते सुद्धा मुंबई बाजारपेठे मधिल आलेल्या अनुभवा पासून ते आवश्यकता असल्या सुधारणा करून सर्व भारतामध्ये मार्केट केले जाते.
३) ईतके असुनही प्रत्येक कंपनिच्या विक्री ची सखोल विश्लेशण केल्यास असे समजून येते कि मुंबई बाजारपेठेतिले विक्री हि
संपुर्ण भारता मधिल विक्रीच्या तुलनेत लक्षणिय आहे.
४) याचाच अर्थ असा कि भारतामध्ये सर्वात भोळी भाबडी जनता मुंबई मध्येच राहते. कारण ति त्याना काय काय नाही पुरविते?
आपल्या राहत्या भागात एखादे निवीन होटेल सुरू झाल्यास आपण स्वतः च त्याला भेट देण्या उत्सुक असतो पण भारतात अन्यत्र इतका स्वागतशिल समाज नसतो. किती तरी प्रलोभने द्यावी लाग्तात तेव्हा कुठे कोणी तरी येते नाही तर नाविन्याचे स्वागत तर दुरच त्याला अनुल्लेखानेच मारले जाते.
आपण सर्व सुजाण मराठी / मुंबईकर जनतेने आता कठोर आत्म-परीक्षण करून असे घाउक पणे बळी जाणे थांबविले पाहिजे. कोपराने भुई खणून आता तर पाताळात जाण्याची पाळी आली आहे.
सबब आता तरी थांबा आणि विचार करा.

Friday, October 03, 2008

मुलभुत हक्क आणि एस. इ. झेड.: संदर्भ टाटा नेनो प्रकल्प


सिंगुर प्रकरण एक प्रकाराने गाजले ते चांगलेच झाले. पण एका प्रकल्पाची हत्या केल्याचा आरोप सुश्री ममताजी वर लागला.
खरे खोटे काय ते ठरविणे हे ह्या चर्चेचे उद्देश्य नाहि. भारतिय घटने द्वारे प्रदत्त एका मुलभुत अधिकारान्बद्दल चर्चा मी येथे आमंत्रीत करीत आहे.
जसे भाषण, संचार इ. स्वातंत्र्य आहे तसेच स्थावर व जंगम संपत्ती संपादनाच मुलभुत हक्क सुरुवातिला होता.
पण सर्व प्रथम पंतप्रधान ज.ला. नेहरू याना समाजवादाची दारुची नशा अशी चढली होती के त्यानी हा अधिकार घटने दुरुस्ती द्वारे काढुन घेतला.
आज कश्मिर राज्याला असलेल्या विशिष्ट परिस्थिती मुळे आपण तेथे स्थावर व जंगम संपत्ती विकत घेउ शकत नाहि. पण इतरत्र घेउ शकतो.
पाकिस्तान, बांगलादेश मध्ये तर शत्रू संपत्ती कायदा आहे ज्यात निर्वासित झालेल्या हिंदुची संपत्ती स्थानीक नागरिक राजरोस पणे घेउ शकतात त्याची खरेदी विक्री हि करू शकतात. आज बहुराष्ट्रिय बैंकाना मुक्त बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे तर मग आमचे हात का बांधून ठेवले आहेत?
माझे तुम्हा सर्व सुविद्य मंडळिना विनम्र निवेदन आहे कि आपण या मुलभुत अधिकाराची पुनः आवश्यकता आहे कि नाही.

Saturday, September 20, 2008

शिवाजी राजांचे गुरू कोण?

शिवाजी राजांचे गुरू त्यांचे आई-वडिल आणि त्याहीपेक्षा अधिक तत्कालीन राजकारण असावे असे वाटते. तरी खाली काही प्रश्न आहेत -
प्रश्न उपस्थित करणे हा एक लोकप्रियता (तिहि फाजिल) मिळविण्याचा राजमान्य राजरस्ता झाला आहे. ह्या अश्या पोरकट व्यापामधे मि पडणार नव्हतो पण जबाबदारि म्हणुन् घेतलि सबब हा उत्तरान्चा सन्च. खरे तर या सर्व प्रश्नान्चि उत्तरे कानाखालि ओढणे एक हाच आहे.
इतिहास हा कधि हि तटस्थ व्रुत्ति ने लिहिला जातो.
इति + ह + आस = इतिहास
जो जसा घडला तसा लिहिला जातो.
यात जर - तर ला थारा नसतो. जे घडले तसेच्या तसे लिहिले जाते.

१. पुणे-जुन्नर भागातील शहाजी राजांची जहागिर अदिलशाही आणि मोघलांनी बेचिराख करून टाकली होती. त्या भागातच जिजाबाईंना पाठवण्यात शहाजीराजांचे कोणते राजकारण असावे?
आजकाल जशि नोकरि केलि जाते तशि नोकरि शहाजि राजे यान्चे काळात केलि जात नव्हति. मुघलान्कडे तर सैनिकाना पगारच दिला जात नव्हता तर लुटिचा हिस्सा मिळत होता. रोख पगारि सैनिक हि प्रथा मुळात शिवाजि राजानी सुरु केलि. त्यामुळे शिवाजि महाराज व जिजाबाइ येथे राहुन आपलि जहागिर व शेतिभाति साम्भाळतिल यात शुद्ध हेतु हाच असावा.कारण जरि जहागिर नसलि तरि शेति भाति तरि करणे गरजेचे होतेच. त्याच बरोबर् इतर् मराठि जनता हि शेति करुन निटनेटके राह्तिल.


२. जिजाबाईंशी जाधव घराण्यामुळे त्यांचे विशेष सख्य नव्हते म्हणावे की जिजाबाईंचा मुत्सद्दीपणा पाहून त्या आणि लहान राजे लांब राहून आपले स्वप्न पुढे चालवू शकतील असा त्यांना विश्वास होता हे कळत नाही. जिजाबाई पुण्यात स्थायिक होत असता त्यांच्यासह हुशार सल्लागार आणि अमात्य देण्यात शहाजी राजांचे डावपेच होते काय?


याला काहि अर्थ नाहि. आपल्या मुला बायको सोबत हुशार अमात्य देणे हे गरजेचे का नाहि वाटणार? राज्य कारभार चालविणे हे एक टिमवर्क असते. जरि जिजाबाई मुत्सद्दि असल्या तरि एकट्याचिच जबाबदारि वर सोडणे त्याना बरोबर् वाटले नसेल्.

३. तरूण वयात दहा-पंधरा मावळ्यांच्या साथीने राज्य उभारण्याचे स्वप्न पहाणे शक्य असले तरी साकारणे कठिण होते. शहाजीराजांचा याला अव्यक्त पाठिंबा होता काय?
अर्थातच का नव्हता. वेळो - वेळि तो प्रत्यक्ष दिसुनहि आला होता.

४. रामदास स्वामी आणि तुकाराम हे राजांना खचितच गुरूस्थानी असावेत परंतु राजकारणात किंवा राजांना घडवण्यात यांचा सहभाग किती?

हे दोघेहि सन्त म्हणुन अर्थातच मोठे आहेतच् पण रामदास स्वामिन्चे महत्व आणि सहभाग आहेच आणि तो श्लोकबद्ध हे झाला आहे. उदा. विजापुरहुन सरदार निघाला आहे अशि रचना करुन् एक सन्देश अफझलखानाच्या वेळि पाठविला होता.