Friday, January 28, 2011
वर्गलढा एक कविकल्पना
१) साम्यवादी आणि समाजवादी विचारसरणी वर्ग लढ्यावर आधारित आहे. त्या अनुसार समाजात २ वर्ग आहेत, १ आहे रे आणि दुसरे नाही रे. आहे रे नाही रेंचे शोषण करून श्रीमंत होत असतो आणि या दोन वर्गांचा लढा सामाजिक आणि राजकीय क्रांती च्या रूपाने उभा करून समाजात समानता आणणे हे यांचे उद्देश्य आहे / होते. २) पण प्रत्यक्षात पूर्वेत आणि पश्चिमेत दोन्ही कडील देशात जर अभिजात साहित्य वाचले तर असे दिसून येते की २ राजांमधेय्च लढाया झाल्या आहेत. गेल्या १०० वर्षांतील काव्य नाट्य, साहित्य कृतींमध्येच फक्त वर्ग लढा इ वाचावयास मिळते आहे. आजही टाटा बिर्लाशी लढतो आहे, अंबानी त्यांनाच समकक्ष अश्या स्पर्धकांशी लढतो आहे. आहेरे आणि नाहीरे तर मिळून मिसळून एकत्र उद्योग, समाज इ चालवीत आहेत. ३) मुळात हे दोन वर्ग समाज रथाचे २ चाके आहेत. त्या दोन चाकांमध्ये अंतर आहे त्या अंतरामध्येच तर समाजाचा रथ चालू आहे, जर हे दोन्ही चाके एकत्र आली तर समाज रथ कोसळून पडेल. वर्ष २००८-०९ मध्ये खुपा भयंकर अश्या आर्थिक आपत्ती आल्या होत्या. आजही आहेरे वर्ग त्यातून पुरेसा सावरला देखिल नाही. पण तरीही गेल्या ३ महिन्या पासून सगळी कडून करोडो डॉलर्स च्या देणग्या जाहीर होत आहे असे दिसते आहे. ४) चीन व रशिया हे दोघेही साम्यवादी देश गेली २० वर्षांपासून आप आपल्या देशात दूरगामी व मूलभूत असे परिवर्तन करून केव्हाच मोकळे झाले आहेत. आजचा रशिया व चीन हा १००% साम्यवादी देश नाहीच मुळी. ५) पण भारत मात्र अजूनही कला, नाटके, सिनेमा साहित्य व काव्य प्रांताद्वारे अजूनही नायक म्हणजे क्रांतिकारी व तो आहेरे ना धडा शिकवून नाहीरे चे राज्य स्थापित करणारा तारणहार असेच समजून चालीत आहे. यात हजारो करोडो रुपयांचे सिनेमा, नाट्य, साहित्य उद्योग पोसला जात आहे त्याही पेक्षा खतरनाक नक्षलवाद हि जोपासिला जात आहे. मूलभूत चूक न सुधारणे हे आम्हा भारतीयांचे दुर्दैव आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment