Thursday, August 21, 2008

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ

मराठी माणसं तशी चांगलीच असतो पण तरीही आपापसातील सौहार्दाची / सहकार्याची भावना ह्याची १००% भरवशाची नसते. माझा जन्म महाराष्ट्रातच झाला व शालेय शिक्षण इ. सुद्धा महाराष्ट्रातच झाले. पुढे कर्मधर्म संयोगाने मी मध्य प्रदेशात गेलो व तिथलाच झालो. मी माझ्या आईला म्हणालो, 'अग तिथली माणसे फारच चांगली आहेत;एकमेकांना मदत करतात'. त्यावर माझा बाबांचे उत्तर असे; ' अग जा गं, तो तुला सांगतो आणि तू ऐकतेस, असे कधी होत काय?' मराठी माणसांवरचा ठाम विश्वास (!) त्या शब्दामध्ये व्यक्त होत होता. पण तरीही मी तिथेच राहिलो. आणि माझा मराठी माणसांचा अनुभव तसाच सकारात्मकच राहिला होता. सध्या काही महिन्या पूर्वी मी परत महाराष्ट्रात आलो आहे आणि माझा मराठी माणसांचा अनुभव तसाच आहे. माझ्या मते जिथे मराठी माणूस सीमित संख्येत आहे तिथे तो फारच सुसंघटित आहे. पण महाराष्ट्रात मात्र दुहींचा गुणाकार आहे. जेथे जाल तेथे भांडण तटा आहेच.
जेव्हा दोन अनोळखी मराठी माणसे भेटतात तेव्हा ते एक तर हिंदी मध्ये संभाषण करतात व काहीश्या संशयाने वा खत्रुडपणाने वागतात (उदा. रेल्वे ट्रेन मध्ये प्रवासी मराठी सौजन्य इ. ) याच्या बरोबर उलट अन्य भाषिक आपल्या बांधवांशी सलोख्याने वागताना दिसतात.
सरते शेवटी हा प्रश्न राहतो की मग याचे उत्तर काय? महाराष्ट्रा बाहेरच मराठी माणूस नीट नेटका मिळून मिसळून राहतो व महाराष्ट्रा मध्ये त्यात भांडखोर राक्षस संचारतो की काय? असे असेल तर आपण मुंबई सह समस्त महाराष्ट्र अन्य भाषिकांना देऊन टाकवी आणि अन्यत्र जावे. जिथे आपण सुसंस्कृत पणे वागू. एकीने राहू.
_________________________________________________________________

असहमत
महाराष्ट्रा बाहेरच मराठी माणूस नीट नेटका मिळून मिसळून राहतो व महाराष्ट्रा मध्ये त्यात भांडखोर राक्षस संचारतो की काय?

नाही! महाराष्ट्राबाहेरही तो भांडतो. माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मी आपल्याला भुबनेश्वरला येण्याचे निमंत्रण देत आहे. म्हणजे खातरजमा होईल.

विनोद जरा बाजूला ठेवून माझे एक निरीक्षण सांगत आहे. माझ्या मते सर्व प्रांतीय आपल्या प्रांतातील लोकांबद्दल थोड्याफार फरकाने असेच म्हणत असतात. पाटीतल्या खेकड्यांची गोष्ट ओरिसातील लोकही अगदी चवीने सांगत असतात!

____________________________________________________________________

भावंडातच भांडणं होतात

-

-

-

आपले वीचार मला अजीबात आवडले नाहीत. आपण आम्हा महाराष्ट्रींना राक्शस म्हणता. आपण परप्रांतात रहायला काय गेले, तूम्हाला त्यांच सगळं गोड-गोड लागायला लागलं. महाराष्ट्र अन्य भाषीकांना देण्याएवजी आपणच सूस्त व आळशी असणाऱ्या मध्यप्रदेशात राहायला गेलात ते बरचं केलं. तेंव्हा आता तीकडचाच व त्यांचाच वीचार करा.

__________________________________________________________________

भावंडातच भांडणं होतात
भावंडातच भांडणं होतात: मान्य! पण त्यातही लगेच हमरीतूमरी वर येण्याची गरज नसते. पण आपण कुठेही आपसातील बंधूभाव व्यकत होउ देत नाहि. उलट त्याचे पर्यवसान हे मारामारीतच होते. एकुणच गोडीगुलाबिने वागणे हे मराठी रक्तातच नसते. हसून बोलणे शिकण्यास अजून कित्येक जन्मे वाट बघावी लागेल असे वाटते. विनोदी लेख, नाटके इ. हजारो वाहिन्या दिवस रात्र हसविण्याचा प्रयत्न करित असतात पण मराठी माणुस हसरा कधिच नसतो.
मध्य प्रदेश आळशी सुस्त इ. ताशेरे ओढणारे तुम्ही कोण ? माझ्या लेखात मी असेही लिहिले होते कि आता मि परत महाराष्ट्रातच आलो आहे. आणि माझा मराठी लोकांचा आलेला अनुभव मी मांडला. त्यातही मला टिपीकल मराठी अनुभव मिळाला. तुम्हीच माझा मुद्दा सिद्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
___________________________________________________________________

वो
:)

No comments: