Friday, August 29, 2008

एक तोळा देशभक्ती

आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो?

जर हा प्रश्न एका लहान मुलाला विचारला तर तो हात जेव्हडे ताणता येतील तेव्हडे ताणून म्हणेल "एव्हड प्रेम करतो". तरुण मुलाला विचरल तर तो म्हणेल खूप प्रेम करतो... आणि दोन मिनीटानी समोरचा सिग्नल न बघता सुसाट निघून जाइल.

दोन वर्षपूर्वी मी इंडोनेशिया मध्ये गेलो होतो. तिथे सगळीकडे रंगरंगोटी केली होती. सगळी कार्यालये सजवली होती. मी सहज विचारलं तर अस कळालं की १ महिन्यापूर्वी त्यांचा स्वातंत्र्यदीन होता.

ह्याउलट जर तो मनुष्य आपल्यकडे आल असता तर.. अगदी १५ ऑगस्टला ही आला असता तरीही त्याला रस्त्यावर चिखलात पडलेले.... त्याच्यावरून गाड्या गेलेले.... काहींवर रीबॉकच्या बूटांचे ठसे उमटलेले झेंडे मिळाले असते. विश्वास बसत नसला तरीही हे सत्य आहे. मी स्वतः असे कित्येक झेंडे उचलून घरी आणून ठेवले आहेत.

काहींसाठी हा दिवस तर लाँग विकेण्डचा असतो... "कुठेतरी टुर वर जाउयात मस्त!"

काही लोक कसेबसे उठून पोरांना शाळेत सोडायला जातात. आणि हो.... आम्ही टी. व्ही. वरचा देशभक्ती पर पिक्चर बघतो हं! न्यूज वाहीन्यान्साठी हा दिवस भरपूर कमावण्यासाठी असतो. काहिही प्रश्न... करा एस एम एस!

अशीच आपली देशभक्ती... १ तोळा... १/२ तोळा!

आपण खरच प्रेम करतो आपल्य देशावर?

______________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">आपण खरच प्रेम करतो आपल्यावर?

देश म्हणजे काय? देशावर प्रेम म्हणजे कोणावर?

भारतातील भूमी म्हणजे देश?

का भारतीय संस्कृती म्हणजे देश?

का भारतीय माणसं म्हणजे देश?

जे प्रेम करण्याएव्हडे प्रगत असतात, त्यांना धर्म, भाषा ..... देश अशा कुठल्याच कारणांची आवश्यकता नसते. असे लोक दुसऱ्याच्या देशालाही मान देतात.

आपल्या राष्ट्रगीताला, सिनेमागृहात परदेशी लोकांनाही उभं रहिलेलं पाहिलं आहे, आणि आपल्या लोकांना बसलेलं.

स्वतःचा ज्यांना अभिमान आहे त्यांकडून सगळ्यांनाच योग्य मान मिळतो.

प्रेमाला देशाची बंधन नाहीत.

आणि बाकीचे............... त्यांना प्रेम आणि आपुअलकी वाटण्यासाठी देशाच्या सीमाही अपुऱ्याच.

__________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">नेते

आज कालच्या कोणत्या नेत्याच्या वागण्या मधून देशप्रेम व्यक्त होते. आठवा स्वातंत्र्य लढ्याचे दिवस , तेंव्हाचे नेते आणि त्यांच्या आवाहनांना प्रतिसाद देणारी जनता.

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">देशभक्तीची व्याख्या!

-

-

-

लहानपणापासून ते कॉलेजचे शीक्शण पूर्ण झालं तोपर्यंत तरी माझं माझ्या देशावर, ह्या भारतावर प्रेम होतं. आता तीच भावना मला बालीश वाटते. सध्या तरी स्वतः पूरता वीचार करायचा, जे आजूबाजूला घडतंय त्याचा आपल्यावर कूठलाही परीणाम होणार नाही याचीच खबरदारी घेत जीवन व्यतीत करणं, हा योग्य मार्ग वाटतो.

देशात राहून आपलं पोट भरण्याठी काम करणं व कर भरणं मला तरी हीच देशसेवा वाटते.

देशभक्ती वा देशप्रेम अमूक एका पद्धतीनेच व्यक्त करायला हवं असे नीर्देश असता कामा नयेत.

__________________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">संबंध
याचा संबंध देशप्रेमाशी कमी आणि सार्वजनिक स्वच्छतेशी जास्त वाटतो आहे. आधी अनेकदा म्हटल्याप्रमाणे जेव्हा सार्वजनिक स्वच्छता आणि सिव्हिक सेन्स आपल्याकडे येईल तो आपला सुवर्णकाल. परदेशातही अनेक लोक स्वातंत्र्यदिनाचा दिवस सुट्टी म्हणून घेतात. सगळे मानसिकतेवर अवलंबून आहे. कुठलीही गोष्ट त्याच इंटेंसिटीने वर्षानुवर्षे करणे अवघड असते.
आजच्या पिढीने (माझ्यासकट) पारतंत्र्य म्हणजे काय हे पाहिलेले नाही. त्यांच्या मनात देशप्रेमाविषयी तीच भावना येईल अशी अपेक्षा कितपत बरोबर आहे?
याचा अर्थ हा प्रतिसाद देशविरोधी आहे असा लावू नये. पण स्वातंत्र्यदिन साजरा करतना आपण नेमके काय करतो? आणि जे काही करतो त्यामुळे समाजाला कितपत फायदा होतो?
हॅम्लेट
_________________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">प्राधान्य देण्याची गरज...
देशभक्ती आहेच, त्यास दुसरा काही मतभेद असणे नाही.
पण देशप्रेमासमवेत सर्व ठिकाणी देशहितास प्राधान्य देण्याची गरज पूर्ण होत नाही. मी मागे एक चर्चाविषय येथे लिहिला होता, त्यात याबद्दल सविस्तर लिहिले होते. दुवा
तसे होईल तो दिवस सुदीन खरा.
___________________________________________________________________

टिचकी मारून प्रतिसाद उघडावा/मिटावा." class="subject">एक तोळा देशभक्ती नवीन
हा चर्चेचा प्रस्ताव सुद्धा किती लोकानी वाचला; त्यावर विचार केला, आपले मत मांडले?
चर्चा प्रस्ताव आला मंगळ., २९/०७/२००८ - १३:३९ त्यावर विचार मांडले आहेत केवळ ५ च. आज १ महिना होउन गेल्या वरही आपण अश्या प्रकारच्या चर्चेसही प्रतिसाद देत नाही किती दैव दुर्विलास हा! खरोखरच भारतमाता दुर्दैवी कि तिला हे असे कुपुत्र मिळाले.

No comments: