दाक्षिणात्यांची आडनावे आणि इंग्रजी अक्षरे
प्रेषक अवधूत कुलकर्णी (शनि., ३१/०५/२००८ - २१:१९)
अलिकडेच मनोगतावर दक्षिण भारतीय नेत्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाविषयी चर्चा झाली। या चर्चेतील प्रतिसाद वाचताना श्री। आजानुकर्ण यांनी दिलेल्या दुव्यातील यादी पाहण्यात आली। सर्व नावे पाहताना ती व्यक्तिनाम, आडनाव अशा पद्धतीने आल्यासारखी जाणवतात. मात्र अलिकडे दाक्षिणात्य लोकांची नावे वाचताना त्यांच्या नावाच्या प्रारंभी इंग्रजीतील अद्याक्षरे वापरलेली असतात. उदा. K. श्रीकांत, J. जयललिता, इ. अशी इंग्रजी अद्याक्षरे वापरण्याची पद्धत इंग्रजांच्या संपर्कातून सुरू झाली, हे उघड आहे. मला प्रश्न असा पडला, की ही प्रथा नेमकी कोणी, केव्हा व का सुरू केली? त्यापूर्वी नावे ठरविण्यासाठी नेमकी काय पद्धत असावी?
योगेश उवाच :
मूळात हि अशी अपभ्रन्शित आडनावे हि इंग्रजी / इंग्रजांच्या संपर्कातून सुरू झाली। उत्तर भारतात हि गुप्त चे गुप्ता मिश्र चे मिश्रा शुक्ल चे शुक्ला झाले। इंग्रजांच्या भारतीय भाषा शिकण्याच्या तर्हा निराळ्या होत्या. उदा. "दरवाजा बंद कर दे" हे वाक्य इंग्रज लोक "देअर वौज अ बेंकर डे (There was a banker day)" असे म्हणून करी सबब त्यांचे उच्चारण इंग्रजी तर्हेने होत असे. पुन्हा आपण मराठी भाषिक तर त्यंच्या साठी अधिकच उदार झालो होतो. इंग्रजी व्याकरणा सारखेच सन्स्कृत व्याकरण बनवून (टेलर मेड) घेतले गेले. उदा. प्रथम पुरुष एकवचन मुळ सन्स्कृत व्याकरणात स: असुनही आपण फक्त महाराष्ट्रात अहम असे करवून घेतले आहे. कारण इंग्रजाना समजाविणे सोपे जावे. सर्व प्रथम महाराष्ट्रातील शाळेत सन्स्कृत विषयाचे अनुवादाची भाषा इंग्रजी होती. सन्स्कृत विषयाचे शिकविणे हि "गम / गच्छ = टु गो" अश्या तर्हेने प्रचलित होते. मात्र महाराष्ट्राबाहेर मात्र सन्स्कृत पारंपारिक स्वरुपातच शिकविले जात होते व आहे.
शुद्ध मराठी
स्वामीयोगेश यांचा काहीतरी गैरसमज होतो आहे. इंग्रजांना विनाकारण दोष देऊ नये. त्यांना भारतीय उच्चार जसे ऐकायला आले तसे त्यांनी ते त्यांच्या सव्वीस मुळाक्षरांत लिपिबद्ध केले. इंग्रजीत आ-कारान्त शब्द नाहीत. ते आपण करतो त्या 'इंडिया' शब्दाचा उच्चार ते 'इन्डिअ' करतात. त्यामुळे इंग्रज, 'गुप्त'चे गुप्ता करणे शक्य नाही. मराठी भाषक आणि महाराष्ट्राच्या जवळपासच्या प्रदेशांतील लोक सोडले तर तमाम उत्तरी आणि दक्षिणी भारतीयांना कखगघ म्हणता येत नाही. ते काखागाघा असेच म्हणतात. अभिनेता अमिताभ बच्चनसुद्धा याला अपवाद नाही, हे त्याच्या दूरदर्शनवर पाहिलेल्या एका मुलाखतीवरून दिसून आले. मराठीतला सारेगमप कार्यक्रम हिंदीत सारेगामापा होतो. GUPT चा उच्चार गप्त होतो हे सांगायची गरज नाही. त्यामुळे इंग्रजांनी ऐकलेला गुप्तऽ हा उच्चार, रोमनमध्ये बरोब्बर लिहिला. इंग्रजांनी मराठी नांवा-गांवांची स्पेलिंगे इतकी योग्य केली होती की ती बदलण्याची आजतागायत आवश्यकता पडलेली नाही. ( Vasant, Wakde, Deo, Oke इत्यादी.)
हिंदुस्थानात नव्याने आलेल्या एका इंग्रज अधिकार्याला आपल्या चौकीदाराशी हिंदी बोलण्याचा प्रसंग दिवसातून दोनदाच येई, एकदा दरवाजा उघड म्हणून सांगायला आणि एकदा बंद करण्यापूर्वी. हे हिंदीत कसे सांगायचे ते त्याने आपल्या साहाय्यकाला विचारले. त्याने दोन वाक्ये सांगितली, 'देअर् वॉज़् अ ख़ोल्ड्(कोल्डचा अस्सल इंग्रजी उच्चार!) डे' आणि 'देअर् वॉज़् अ ब्राउन् क्रो'. आणि ही वाक्ये ऐकून, दारवान दरवाजा उघड आणि बंद कसा करतो ते त्या अधिकार्याला आयुष्यभर समजले नाही, अशी हकीकत आहे.
इंग्रजांना संस्कृत मराठी लोकांनी शिकवले हा भ्रम आहे. त्यांना शिकवणारे काशी-गया येथे असंख्य ब्राह्मण होते. आजही अमेरिका किंवा जर्मनी या देशांत संस्कृतचा जेवढा अभ्यास होतो, तेवढा महाराष्ट्रात होत नाही. वॉशिंग्टन विद्यापीठातील संस्कृत पुस्तकांची यादी संकेतस्थळावर आहे. तितकी पुस्तके पुणे विद्यापीठात नाहीत. हिंदू तत्त्वज्ञानविषक पुस्तकाची एक छोटीशी यादी दुवा क्र. १ इथे पाहा.
अहम् आणि सः हे दोनही शब्द मूलतः वेगळे आहेत. मराठी लोकांना इंग्रजांच्या सोयीसाठी सः चे अहम् केले हा निव्वळ जावईशोध आहे.

योगेश उवाच -
इंग्रजी व्याकरणाचे फर्स्ट पर्सन "आय" एकवचन, व "वुई" अनेकवचन असे होते तसेच थर्ड पर्सन "ही" एकवचन , "दे" अनेकवचन असे असते। सन्स्कृत व्याकरणाचे प्रथम पुरुष अहम असे न होता सः , तौ, तान, (एकवचन, द्विवचन व बहुवचन) असे असते तसेच कुठलाही धातूचे रुप जसेः मि, वः, मः; असे चालविले जाते. परंतू महाराष्ट्राबाहेर हेच ति, तः, अंती असे शिकविले जाते. त्याचे तार्किक कारण काय असू शकेल? तसेच सन्स्कृत व्याकरणात काळ वेगळे असे नसून लट लकार, लंग लकार इ. असे शब्द आहेत जे महाराष्ट्रा तिल शाळेत शिकविलेच जात नाहि. परंतू अन्यत्र (अन्य राज्यातिल) शाळेतिल सन्स्कृत पुस्तके आणि सिद्धांत कौमुदी इ. ग्रंथ मात्र असेच सांगतात. त्याचे काय?
Tuesday, January 20, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment