Wednesday, February 18, 2009

बोले जैसा चाले त्याची वन्दावी पाउले

बोले जैसा चाली त्याची वंदावी पाऊले!
आपल्या घरात आपल्या मनात आपल्या स्वगतामध्ये आपण जसा उल्लेख सर्व जातियांचा करतो तोच आणि तसाच उल्लेख आपण जाहिर पणे लेखी व बोली मध्ये करावा. किमान तेवढे धैर्य तरी असावे. ब्राह्मणाना बामण जर मनात / घरात / स्वगतात म्हणत असू तर तसेच जाहिर पणे बोलावे. गेली पिढी तसेच करित होती पण आता मात्र खोटेपणा शिरला आहे गोंडस नावाने सम्बोधण्याचा. हा खोटेपणा संपवा. मनात एक आणि तोंडात दुसरेच लेखी तर तिसरेच असे न करता तिन्ही ठिकाणी मनसा, वचसा आणि कर्मणा तिन्ही स्तरावर आपण समस्त मानवजातिस एकाच संबोधनाने संबोधावे.
काल अश्याच अर्थाची प्रतिक्रिया मी मनोगतावर लिहिली होती पण प्रशासकिय लुडबुडिमुळे ति प्रकाशित झाली नाहि. तेवढे धैर्य नसेल बिच्यार्या प्रशासकामध्ये.

No comments: