इंग्रजान्चे राज्य नविनच सुरू झाले तो पर्यंत आपल्या देशात ग्राम पंचायत गावाचा शेतसारा गोळा करित असे. तो शेतसारा हा धान्य रुपाने गोळा होत असे व त्यातिल २५% भाग हा राजाच्या खजिन्यात जमा होत असे. यालाच पेशवाई / शिवशाहित चौथाई असे म्हणत. उरलेला ७५% महसुल ग्राम पंचायतिच्या देखरेखित गावाच्या विकास कार्यान्साठी होत असे. म्हणून राजधानित कोणिही राजा राज्य करित असे वा जुलुम करित असेल त्याची प्रत्यक्ष झळ सर्व सामान्य जनतेस पोहोचतच नसे. म्हणून वर वर बघता भारतीय जनता उदासीन दिसत असे. हिच पद्धत मुघली अमलातही होति।
पण इंग्रजानी मात्र शेतसारा हा केवळ रोख रुपयान्मध्ये घेण्यास सुरुवात केली. तसेच १००% शेतसारा हा सरकारी खजिन्यात जमा करून घेउ लागले. त्याने जनता केवळ राज्यास आणि राजधानीस शरण गेलि. जे काम स्थानिक ग्राम पंचायती मार्फत बीनबोभाट होउ शकते ते करण्यास संपुर्ण जिल्ह्याच्या यंत्रणेशी खोखो पिंगा घालित करावे लागते. आता मात्र आपल्या हाती केवळ मतदानाचा अधिकार आहे. पुर्वी चा उदासीन भाव जो प्रेमचंदांच्या "शतरंज के खिलाडी" ह्या कथे व त्याच नावने बनविलेल्या सिनेमामध्ये दाखविले आहे कि युद्ध असो वा काहिही आपण असेच उदासीन बसून राहणार. तेव्हा आपल्या हाती ७५% तरी होते ज्या योगे आपण स्थानिक ग्रामपंचायतिचे मार्फत आपले हित साधून तरी घेत होतो पण आता मात्र उदासीन राहून फार मोठी चुक करित आहोत. आत मात्र निवडणुकित आपले सर्वस्व पणाला लागले असते पण तरिही सरळ गावाला निघून जाउन आत्मघात करून घेत आहोत.
Friday, May 08, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment