Monday, May 04, 2009

लोबी आणि बुली

मराठी माणसाचे मुख्य २ उणिवा आहेत.
१) लोबी: दबाव गट - मराठी माणुस हा नेहेमी एकटा पडतो त्याच्या साठी कुणिही वाली नसतो. समान धंद्यातिल गुजराती वा मारवाडी समाज हा नेहेमी त्यांच्या समाजाची टेलीफोन यादी वापरून नेहेमी आपला माणुस शोधून काढतो आणि त्यांचा वापर करतो. आपण नेहेमीच इथे मागे आहोत. धंदा हा केवळ स्पर्धेमुळेच विकसित होतो. ४ लोकांच्या सहकार्याने नेहेमी पाठबळ मिळते.
२) बुली - दबाव तंत्र: केवळ पैसा/ भांडवल वापरून कामे घेतली जात नाहित तर आपल्या पुरवठादारान्वर पुरेसे दबाव हि आपण ठेवले पाहिजे. इथेही अन्यत्र समाजी पुढे आहेत.
खरे तर ह्या फारच मोठ्या उणिवा आहेत. आज दिल्लितही मराठी टक्का कमी का त्यचे उत्तरही हेच आहे. लोबि आणि बुली चा अभाव. फार गरिब धोरण ठेवून चालत नाही तर दबाव तंत्र हि आवश्यक असते. गेली ५० वर्षे महाराष्ट्रात कॉंग्रेस चा मुख्य्मंत्री आहेत पण आय. ए. एस. अधिकार्यंची बदली करण्यात मायवती नेहेमी पहिल्या आहेत पण मराठी मुख्यमंत्री ते सहजगत्या कधिच करू नाही शकत.

No comments: